Saturday, 1 April 2017

Opportunity to air your suggestions on Twitter From: BSNL CARE Maharashtra replied on Thu, 30 Mar 2017 09:23:56 Add to address book To: You | @chandrakantvjp

०२ / ०४ / २०१७.
साहेब नमस्कार आणि सूचना आमंत्रणासाठी धन्यवाद. 

विनंती आहे की " बिना इंटरनेट व बिना एंड्रोइड-स्मार्टफोन वापरता कोणत्याही साध्या मोबाईल फोन चा वापर करुन सुद्धा यूएसएसडी मंचचे सहाय्याने *99# डायल करून डिजीटल पैशाची देव-घेव करण्याची व्यवस्थां करता येते. या पद्धतीने भुगतान करणे देखील सर्वांना सोपे आणि परवडणारे आहे. "

" विशेष करून अशिक्षित गांवकरी मंडळी देखील या व्यवस्थेचे पालन करून कुठल्याही जागेवरून वीज बिलांचे भुगतान करून आपले स्वत:चे व देशाचे पेट्रोल, श्रम, पैसे, वेळ वगेरे वाचवून दूरभाष विभागाचे मनुष्यबळ आणि होत असलेली थकबाकी रोखण्यात सुद्धा मदत करू शकतील.

" दूरभाष विभागाचे सर्वच अधिकार्यांना व कर्मचार्याना देशहितार्थ तसेच पंतप्रधान साहेबांच्या आवाहना प्रमाणे कळकळीची विनंती व मागणी करण्यात येते की :---- 

(१) '' अधिकारी साहेबांनी देयकांची थकबाकी कमी करण्यासाठी तसेच देशहिताचा, नागरिक सुविधेचा आणि पंतप्रधान साहेबांच्या आवाहनाचा विचार करावा.
*99# डायल करून नागरिकांनी केशलेस बिल जमा करावे म्हणून बीएसएनएलने दरमहा बिलांवर दूरभाष विभागाचेचे स्थानिक बैंकखात्याशी जोडलेले मोबाईलचे क्रमांक - त्याची एमएमआयडी, बैन्केचे आयएफएससी कोड - बैंकखाते क्रमांक, " पेमेंट एड्रेस " इत्यादी माहिती छापण्याचे करावे,याचे फलक लावावेत आणि ही माहिती ई-माध्यमांतून व मुद्रण माध्यमातून सार्वजनिक करावी. '' 


(२) दूरभाष बिल जमा होणार्या प्रत्येक केंद्रांवर पीओएस मशीन ( अर्थात एटीम / डेबिट कार्ड स्वाईप करून भुगतान करणारे यंत्र.) उपलब्ध करून उपभोक्ता कडून वीज बिल जमा करवून घ्यावे. विश्वास आहे की या व्यवस्थां व्यवहारात आणण्याचे कर्तव्य आपले माध्यमातून होईल, विशेष असे की गेल्या तीन महिन्या पासून सुमारे ९० - ९५% भुगतान मी स्वत: *९९# चा वापर करूँ करीत आहे. अग्रिम आभार. सस्नेह धन्यवाद. 
सादर शुभेच्छांसह, 

विनम्र ग्राहक व देशहित चिन्तक 

चंद्रकांत वाजपेयी. जेष्ठ नागरिक, 
गैरराजकीय सामाजिक कार्यकर्ता, 
एल १ / ५, कासलीवाल विश्व, उल्कानगरी,
गारखेडा, औरंगाबाद. (महाराष्ट्र.) ४३१००१.
Inline image 1  Displaying image.png