Wednesday, 30 October 2013

विश्वास ठेवला, घात करू नका

विश्वास ठेवला, घात करू नका
'मी औरंगाबादकर'चे महापौर, आयुक्तांना निवेदन 
 

loading...

प्रतिनिधी   औरंगाबाद
रंगाबादच्या नागरी समस्यांवर सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून प्रकाश टाकणार्‍या            
मी औरंगाबादकर '  या सामाजिक संस्थेने आज महापौर व आयुक्तांची भेट घेत शहर कचरा व खड्डेमुक्त करण्याच्या दिलेल्या आश्वासनावर आम्ही विश्वास ठेवतो. त्याचा घात करू नका, असे सांगणारे निवेदन दिले. या समस्या सोडवण्यासाठी सक्रिय सहभागी होण्याची तयारीही दर्शवली. 

मागील काळात शहराची झालेली वाईट अवस्था पाहून व्यथित होत शहरातील युवा उद्योजक, व्यावसायिक, आर्किटेक्ट, बिल्डर, पत्रकार, युवकांनी सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून आवाज उठवला असून 'मी औरंगाबादकर' नावाने तयार करण्यात आलेल्या या ग्रुपचे आता दीड हजार सदस्य झाले आहेत. या ग्रुपने शहरातील रस्ते आणि कचरा या विषयावर पुढाकार घेत मोहीम चालवली. या दोन्ही प्रश्नांबाबत वेबसाइट व पत्रांच्या माध्यमातून सह्यांची मोहीम राबवण्यात आली. ही पाच हजार पत्रे व निवेदन देण्यासाठी ग्रुपच्या सदस्यांनी सर्मथनगरपासून वाहन रॅली काढत मनपा मुख्यालय गाठले. 
निषेधातून निर्मितीकडे चला, शहर कचरा व खड्डेमुक्त करूया  '   असे फलक घेतलेल्या कार्यकर्त्यांना मनपाच्या प्रवेशद्वारावर 
अडवण्यात आले. पंधरा मिनिटांच्या वादावादीनंतर त्यांना आत सोडण्यात आले. या कार्यकर्त्यांनी आधी महापौर कला ओझा, उपमहापौर संजय जोशी यांची भेट घेत निवेदन, पत्रांचा गठ्ठा व गुलाबपुष्प देत आपल्या मागण्या मांडल्या. रूपेश कलंत्री, चंद्रकांत वाजपेयी, रेखा शेळके, आशा देशपांडे रोहित चोप्रा आणि इतरांनी महापौरांसोबत चर्चा केली. खड्डे आणि कचरा या दोन समस्या सोडवण्याबाबत तुम्ही आणि मनपा प्रशासनाने दिलेल्या आश्वासनावर आम्हाला विश्वास असून त्याचा घात करू नका. होणार्‍या कामांची गुणवत्ता काटेकोरपणे तपासली जावी, अशी सूचना कार्यकर्त्यांनी केली. कचर्‍याची समस्या सोडवण्यासाठी जबाबदार नागरिक म्हणून मनपाला सक्रिय सहकार्य करण्याची तयारी असल्याचे कलंत्री यांनी सांगितले. महापौरांनी त्यांच्या भूमिकेचे स्वागत करीत या समस्या सोडवण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. यानंतर कार्यकर्त्यांनी आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांची भेट घेऊन त्यांनाही निवेदन दिले. आयुक्तांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेत या कामांत आपण स्वत: लक्ष घालू, असे आश्वासन दिले. या वेळी शहर अभियंता सखाराम पानझडे यांची उपस्थिती होती. या आंदोलनात विलास बारवाल, मनोज असरानी, देवेंद्र उबाळे, मनीषा चौधरी, चेतन डोंगरे, स्वप्निल सराफ, कविता अग्रवाल, विक्रम आहेर, शेख इरफान आदींचा सहभाग होता.

No comments:

Post a Comment