रेडियो कार्यक्रम मन की बात मधून पंतप्रधान ।
या कार्यक्रमात श्री नरेंद्र मोदी साहेबांनी
खाली नमूद लोकशिक्षणाची बाजू मांडावी ।
मित्रांनो, आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्रभाई मोदी जी, हल्ली रेडियो वरील मन की बात या कार्यक्रमातून देशातल्या सर्व सामान्य माणसांशी संवाद साधताहेत ही चांगली बाब आहे, अर्थातच त्यांच्या या व्यवहारामुळे देशात शासनावर संपलेला विश्वास पुन: जागृत होत आहे ।
मला वाटते की पंतप्रधानांनी आणि चुनाव आयोगाने माझ्या द्वारे महाराष्ट्रातील निवडणुकांपूर्वी केलेली विनंती घटनेतील उल्लेखा प्रमाणे आदर्श उमेदवार कोणास म्हणावे ? हे रेडियो कार्यक्रम मन की बात आणि इतर माध्यमाच्या मदतीने सर्व सामान्य नागरिकांना सोप्या भाषेत समजवावी आणि पंतप्रधान साहेबांनी सुरु केलेल्या यां लोकशिक्षणाच्या स्वागत योग्य व्यवस्थेस प्रबळ करावे । याच प्रमाणे चुनाव आयोगाने देखील सातत्याने यां विषयाची पुरवणी करीत रहावे । या प्रयत्न्नांनी देशभरात श्री मोदी जी सारखेच विवेकशील जनप्रतिनिधी समोर येतील हे विशेष ।
काय वाचक देशाच्या कल्याणासाठी खालील विनंती स्वत: कडून पंतप्रधान श्री मोदिजी यांना करतील ?
मी विश्वास करतो कि माननीय वाचक खालील विषयाचे समर्थन करीत स्वत: तर्फे मोदी साहेबांना पत्र पाठवतील त्यासाठी मी त्यांचा सदैव आभारी राहीन । अग्रिम धन्यवाद ।
………… चंद्रकांत वाजपेयी.
05 / 10 / 2014.
आदर्श उमेदवार कोणास म्हणावे ?
घटनेत उल्लेख असल्या प्रमाणे पंतप्रधान श्री नरेन्द्र मोदीनी लोकांना हे सांगून आदर्शता आणि प्रामाणिकता दाखवावी |
महाराष्ट्रातील सर्व मतदाता बंधू - भगिनींनो,
" हे मान्य करावेच लागेल की श्री अण्णा हजारे यांनी आपल्या आंदोलनातून जनतेला, राजनेत्यांना तसेच राजकीय पक्षांना त्यांचे नैतिक, सामाजिक आणि राष्ट्रीय कर्तव्य व अधिकार याची जी कांही शिकवण दिली त्यां शिकवणीचा परिणाम यायला आता सुरुवात झाली आहे | आता राजकीय पक्ष आणि नेते जनते कडून त्यांच्या विचारांची मागणी व मागणीवर योग्य कार्यवाही करू लागले आहेत | " अण्णांची ही देशाला मोठी देणगीच म्हणावी | . हे पण मान्य करावे लागेल की देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब, खरोखर देशहितासाठी प्रामाणिकतेने जीवापाड श्रम करताहेत, झटताहेत| श्री नरेंद्र मोदीजी, आदर्श पंतप्रधान पदाचे गुणयुक्त व्यक्तित्व असल्या मुळे केवळ ३-४ महिन्यातील कामावरून भासते आहे की श्री मोदी देशात आदर्श घडविताहेत |
मित्रांनो, वेगवेगळ्या निवडणुकीतील आदर्श उमेदवार कोण ?
प्रत्येक नागरिकाने हे देखील समजून घेण्याची आज गरज आहे, कारण की केंद्र सोडून सर्वत्र मोदी नाहीत | नगर पालिका असो किंवा विधान सभा तेथे श्री नरेन्द्रभाई मोदी सारखेच सर्व सेवक -जनप्रतिनिधी हवेत तेव्हाच तेथे अप्रामाणिकता व कर्तव्य विहिनतेचा दोष लागणार नाही |
भारताच्या घटनेत उल्लेख केल्या प्रमाणे खरा आदर्श उमेदवार कोण ??
" आदर्श उमेदवाराची व्याख्या आणि त्यांचे सद्गुण व अवगुण "
" श्री मोदी साहेबा कडूनच हे जाणून घेणे सर्वात जास्त उपयोगी राहील असे मला वाटले, म्हणूनच मी त्याना ट्विट करून हे लोकांना समजावून सांगावे अशी विनंती केली आहे | "
मित्रांनो, आपणांस विनम्र प्रार्थना आहे की आपण देखील श्री मोदी साहेबांना पत्र पाठवावे - विनंती करावी की श्री मोदी जी यांनी वर नमूद केल्या प्रमाणे आवश्यक अधिकृत माहिती सार्वजनिक करावी, व त्याची प्रत मला पोस्ट करावी, मी संबंधित सर्वांचा आभारी राहीन |
................ चंद्रकांत वाजपेयी.
जेष्ठ नागरिक व गैरराजकीय सामाजिक कार्यकर्ता, औरंगाबाद (महा.) ई-मेल :-- chandrakantvjp@gmail.com
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना माझ्या द्वारे पाठविलेले ट्विट खालील प्रमाणे आहे :--
Chandrakant Vajpeyi
CHANDRAKANT VAJPEYI @chandrakantvjp 1m1 minute ago
@narendramodi लोग आप की मानेंगे, कृपा करे बताएं, संविधान में आदर्श जनप्रतिनिधि की व्याख्या व आदर्श उम्मीदवार के सभी सद्गुण व अवगुण क्या है ?
2:29 AM - 5 Oct 2014 · Details Collapse Reply Favorite
No comments:
Post a Comment