Sunday, 24 July 2016

" सत्ता और राजनीतिक व्यवस्था के संबंध. "

" सत्ता  और  राजनीतिक व्यवस्था के संबंध. " 

श्री सतीश गर्ग जी,
आपकी पोस्ट पढने के बाद मेरे भी विचार में आया कि किसी दल को त्यागकर कांग्रेस दल का सदस्य बनने की प्रक्रिया पर आजकल लक्ष्मण रेखा सी खींची दिखाई दे रही है ।
अलबत्ता अपवाद स्वरूप देश में इक्का-दुक्का लोगों ने इस रेखा को भी पार किया है ।

यहां यह उल्लेख करना योग्य होगा कि  :--
" राजनीति में सत्ता पक्ष को कब तक कोई समर्थन देगा और कब वही समर्थक साथी तख्ता पलटने एक हो जाएंगे कहना कठीन है । इसी कारण डगर पार नही होती और यही राजनिती की सडक का कठीनतम अवरोधक है ।  "

हमेशा अच्छे काम के वातावरण से सत्ता की स्थिरता होना चाहिये, यह बात हर कोई सकारात्मक विचारकर्ता चाहता है । किंतु राजनिति में कई बार उलटे ही परिणामों की अनुभूति देश को हुई है ।

(1) प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी जी के जमाने में अधिकांश दल अटल जी के साथ थे, महंगाई स्थिर थी महंगाई नही बढी, सारी वस्तुएं बाजारों में उपलब्ध थी । ऐतिहासिक प्रगतिशील कामों का विश्वसनीय संचालन भी होता दिख रहा था, सरकार पर जनता का अटूट स्नेह और विश्वास सा प्रतीत हो रहा था, विश्वस्तर पर भारत की साख बढी थी, " इंडिया शायनिंग " से वातावरण गूंज रहा था ।

(2) प्रधानमंत्री इंदिरा गांधी जी की धाक थी, सर्वत्र उनके नारे लग रहे थे, यहां तक की  " इंदिरा इज इंडिया  एण्ड  इंडिया इज इंदिरा "  तक की आवाजे गूंज रही थी । कोई इंदिरा जी के विरोध में नही बोल रहा था । एक समय घोर विरोधी अटल बिहारी वाजपेयी जी ने इंदिरा जी के बुलंद कामों को नमन कर उनका स्तुति भरा वक्तव्य दिया था ।

विडंबना यही है कि राजनिती में भविष्य का कभी कोई ठिकाना नहीं, और इसी कारण दोनो धाकड प्रधानमंत्री सत्ता के साथ स्थिर नही रह सके, इमरजेंसी के बाद इंदिरा जी सत्ता से बाहर हुई  और  अटल जी का  " इंडिया शायनिंग "  डार्क हो गया, अटलजी सत्ता से बाहर हो गए थे ।

सतीश गर्ग जी  और  देशवासियों,
देश में अच्छे शासक चुनावी सांठगांठ के फेर में सत्ता विमुख हो जाए, यह अच्छी बात नहीं लगती, वेदना होती है और इस कारण प्रचलित पद्धति को बदलने की जरूरत प्रतीत होती है । क्या प्रबुद्ध नागरिक इस दिशा में कदम बढाएंगे ???
..... चंद्रकांत वाजपेयी
ज्येष्ठ नागरिक एवं गैरराजनीतिक सामाजिक कार्यकर्ता, औरंगाबाद (महा.)
ई-मेल : chandrakantvjp@gmail.com

Wednesday, 20 July 2016

अण्णा हजारे यांच्या या कार्यकर्त्यां सारखे सर्व नागरिक झाले तर सर्वोत्तम ।

"  परमआदरणीय अण्णा साहेब हजारे यांच्या या कार्यकर्त्यां सारखे सर्व नागरिक झाले तर सर्वोत्तम."

नांदोलन समुहाचे सदस्य म्हणजे श्रद्धेय अण्णा साहेब हजारें यांचे अनुयायी, असे म्हटले तर वावगे होणार नाही.

पण आपल्या आदरणीय अण्णांचा अनुयायी कसा असतो, तो किती प्रामाणिक असायला हवा, हे समजून घेणे आणि त्या प्रमाणे पावले उचलणे खूप महत्वाचे आहे.   

ही माहिती त्यांचे विशेष अनुयायी डॉ. विश्वंभर चौधरी जी, यांनी शासनाशी केलेल्या प्रेरक पत्राचाराच्या प्रसंगातून जाहिर होते. 

(श्री चौधरीजी चा खाली नमूद पत्राचार आपल्या सर्वासमोर एक आदर्श आहे, पहा ते कसे.) हा पत्राचार फेसबुक वरुन घेतला आहे.


डॉक्टर विश्वंभर चौधरी :--   
सरकारशी वाद-संवाद करतांना कधी कधी असे मजेशीर प्रसंग घडतात...



वरिल पत्राचार वाचून आम्ही जरुर शिकावे :--

(1) नेहमीच माहिती अधिकाराचा उपयोग करताना पूर्ण सावध होऊन काम करायचं.

(2) कोणत्याही परिस्थितीत आपला माहिती अधिकार उपयोगात आणताना शासनाचे कोणतेही नुकसान होऊ द्यायचे नाही.

(3) जर कांही कारणास्तव आपल्यामुळे शासनाचे नुकसान होत असेल किंवा झाले असेल तर त्याची नुकसान भरपाई न सांगता स्वतःच करुन द्यावी.

माननीय डॉ. विश्वंभर चौधरी जी, आपल्या या प्रामाणिक मनोवृत्तिला व या आदर्श पत्राचार प्रस्तुतीला त्रिवार नमस्कार. 
..... चंद्रकांत वाजपेयी.
जेष्ठ नागरिक, गैरराजनीतिक सामाजिक कार्यकर्ते औरंगाबाद (महाराष्ट्र)
Email : chandrakantvjp@gmail.com 


Wednesday, 6 July 2016

व्यवस्था कशी बदलावी, हे सांगण्याचे धाडस करणारी " अर्थक्रांती ."

   व्यवस्था कशी बदलावी,
हे सांगायचे धाडस करणारी 

--:   अ र्थ क्रां ती  :--

जो तो म्हणतो आता व्यवस्था बदलली पाहिजे, मात्र नेमके काय बदलेले पाहिजे, हे कोणी सांगत नाही. प्रश्नांची जंत्री उभी केली जाते, मात्र उत्तरे सांगितली जात नाहीत. अर्थक्रांती प्रतिष्ठान आपल्या पाच प्रस्तावांद्वारे व्यवस्थेत नेमके काय बदलले पाहिजे, हे सांगते. व्यवस्था बदलली पाहिजे, असे म्हणणार्‍या प्रत्येकाने म्हणूनच अर्थक्रांती समजून घेतली पाहिजे.

काळ्या पैशाच्या रोगावरचे अर्थक्रांती हे सर्वात प्रभावी औषध यासाठी आहे की काळ्या पैशाची निर्मिती अर्थक्रांती थांबविते. स्वीस बँकेतला पैसा भारतात कधी येईल, स्वीस बँकेत किती पैसा आहे, आपल्या देशात सध्य किती काळा पैसा आहे, हे आज सरकार आणि इतर कोणी- अगदी अर्थतज्ञही सांगू शकत नाही. त्यामुळे खात्रीचा मार्ग हा आहे की तो तयारच होणार नाही, असेच प्रयत्न करायला हवेत.

अर्थक्रांती प्रस्ताव:
1. सध्या अस्तिवात असलेली करप्रणाली (केंद्र सरकार, राज्य सरकार व स्थानिक प्रशासनचे सर्व कर) पूर्णतः रद्द करणे. (आयात कर अथवा कस्टम ड्यूटी वगळता) देशातील सर्व म्हणजे केंद्र, राज्य आणि पालिकांचे. असे सुमारे 32 कर सध्या आपण भरतो, भ्रष्टाचाराची सुरवात या करप्रणालीतील किचकटपणातून होते.
2. सरकारी महसूलासाठी फक्त ‘बँक व्यवहार कर’ ‘Bank Transaction Tax’ हा सिंगल पॉईंट डिड्क्‍शन टॅक्स लागू करणे. बॅंकेद्वारे होणार्‍या प्रत्येक व्यवहारावर एका निश्चित प्रमाणात वजावट करणे, (उदा.2 ट्क्के प्रती व्यवहार) वजावट फक्त जमा खात्यावरच (रिसीव्हींग एन्ड अकौंट्लाच) व्हावी, ही 2 टक्‍के वजावट निश्चित प्रमाणात केंद्र सरकार, राज्य सरकार, स्थानिक प्रशासन व त्या विवक्षित बँकेच्या खात्यावर वर्ग करण्यात यावी. (उदा.0.70 ट्क्‍के केंद्र सरकार, 0.60 ट्क्के राज्य सरकार, 0.35 टक्के स्थानिक प्रशासन संस्था व 0.35 टक्के तो व्यवहार पूर्ण करणारी बँक)
3. सध्या चलनात असलेल्या रू.50 पेक्षा जास्त दर्शनी मूल्य असलेल्या चलनाचे उच्चाटन करणे. (यामुळे लोकांना बँकेमार्फतच व्यवहार करणे सोयीचे होईल. परिणामी शासनाच्या महसुलात लक्षणीय वाढ होईल) काळया पैशाचा राक्षस उभा करणार्‍या मोठया नोटा (100,500,1000 रू.) चलनातून काढून टाकण्यात येतील. जगात बहुतांश प्रगत देशांमध्ये अशा मोठया नोटा नाहीत. त्यामुळे तेथे भारतात होतात तसे रोखीने मोठे व्यवहार होत नाहीत.
4. शासनाची काही विशिष्ट आर्थिक मर्यादेपर्यंतच रोखीच्या व्यवहारांना कायदेशीर मान्यता अपेक्षित (जसे रू.2000 पर्यंतचे व्यवहार). अर्थातच या मर्यादेपुढील रोखीच्या व्यवहारांना कायदेशीर संरक्षण मिळू शकणार नाही. (अशा रोख व्यवहार मर्यादा निश्चितीकरणामुळे बँक व्यवहारास चालना मिळून शासकीय महसुलात लक्षणीय वाढ अपेक्षित)
5. रोखीच्या कुठल्याही व्यवहारावर ‘बँक व्यवहार कर’(‘Bank Transaction Tax’) लागू असणार नाही.

सोप्या शब्दांत अर्थक्रांतीचे काही पैलू :--
- अर्थक्रांती म्हणजे सर्वांनी बँकमनी वापरणे. विकसित देशांत जसे सर्व व्यवहार बँकेद्वारा होत असल्याने व्यवहारांत पारदर्शकता निर्माण होते, ती भारतातही निर्माण करणे.
- अर्थक्रांती म्हणजे घरात पडून असलेला काळा पैसा व्यवहारात वापरात आणून त्याच्या आधारे देशात संपत्तीचे निर्माण करणे.
- अर्थक्रांती म्हणजे करपद्धतीतील गुंतागुंत काढून आनंदाने कर भरावे वाटतील, अशी व्यवस्था निर्माण करणे.
- अर्थक्रांती म्हणजे सध्या जगताना सर्वांनाच ज्या असुरक्षिततेने ग्रासले आहे, तिला मूठमाती देवून सुरक्षित आणि आनंदी वातावरणात काम करणे.
- अर्थक्रांती म्हणजे राजकारणाला पांढरा पैसा देणे आणि राजकारणातील काळ्या पैशाचा नायनाट करणे.
- अर्थक्रांती म्हणजे प्रशासनात सुधारणा घडवून आणणे आणि त्यामुळे सूकर होणार्‍या आयुष्याचा आनंद घेणे.
- अर्थक्रांती म्हणजे सरकारला विकासकामांसाठी भरपूर महसूल देणे आणि त्यामाध्यमातून रोजगारसंधींना चालना देणे.
- अर्थक्रांती म्हणजे परकीय भांडवलाची गरज संपवून देशातच घराघरात पडून असलेले भांडवल बाहेर काढणे.
- अर्थक्रांती म्हणजे 1, 2, किंवा जास्तीत जास्त 3 टक्के व्याजाने घर, उद्योग आणि शिक्षणासाठी कर्ज देण्याची तरतूद करणे,
- अर्थक्रांती म्हणजे ज्याची आर्थिक उलाढाल अधिक आहे, त्याला त्याप्रमाणात कर भरण्यास भाग पाडणे.
- अर्थक्रांती म्हणजे भेदभाव आणि अन्याय करणारा व्यवस्थेतील मानवी हस्तक्षेप कमी करून ‘रांगेचा फायदा सर्वांना होतो’, यावरचा विश्वास वाढीस लावणे.
- अर्थक्रांती म्हणजे गरीबातल्या गरीबाला मानवी प्रतिष्ठेचे जीवन जगण्याची संधी देणे आणि श्रीमंतांना प्रामाणिकपणे संपत्ती निर्मितीची प्रेरणा देणे.
- अर्थक्रांती म्हणजे 121 कोटी भारतीयांना शांत, समृद्ध आणि प्रामाणिकपणे आयुष्य जगण्याचा हक्क मिळवून देवून जगासमोर आदर्श जीवनशैलीचे उदाहरण घालून देणे.
- अर्थक्रांती म्हणजे भारताला खर्‍या अर्थाने महासत्ता आणि जगातील आनंदी देश बनविणे.
..... चंद्रकांत वाजपेयी ( काका )
सौजन्याने : श्री अरुण फोके.

Friday, 1 July 2016

रमजान पर मेरा दिल मेरी जुबा बोले.

  रमजान पर मेरा दिल मेरी जुबा बोले.

भाईजान
जयहिंद ।
आज रमजान महीने का आखिरी शुक्रवार (जुम्मा)  है ।
आज आपने जुमा-तुल-विदा पूरीतरह धार्मिक परम्परा से मनाया होगा और दिल से  शुक्रवार की नमाज अता की होगी ।
हम अल्ला से आपके खैरियत और बरकत के लिये दुआएं मांगते है । आप हमेशा भले काम करें और ईमानदारी से खूब पैसा कमाए । आपके धन कमाने का पैमाना हमेशा धर्म, जाती और समूह से उपर उठकर रहें ।
यदि आपका निकाह नही हुआ है तो हम दुआ करते है कि आपका जल्दी निकाह हो जाए और हमेशा खुश रहें ।
आप दुनियाभर के हर इंसान को प्यार बांटे और आपको भी प्यार मिले । आपकी तालिम हर इंसान और वतन को सुरक्षित रखनें के साथ साथ उसकी उन्नती करती रहे ।
" जिंदगी में तालिम से यदि इंसा ही खुश ना हो सका तो खुदा कैसे खुश होगा ? "
चलो बहुत बात कर ली, अदब । 💐
आपके
.... वाजपेयी काका,
औरंगाबाद ( महाराष्ट्र )