Monday, 29 August 2016

डॉक्टरांनी सच्चे मानव आणि देवदूत अलंकाराचे खरे मानकरी व्हावे. नागरिकांनी नि:स्वार्थ देहदान-अवयवदान करावे |

२९ ऑगस्ट २०१६.
महाराष्ट्रातील सर्व डॉक्टरांनी सच्चे मानव 

आणि
देवदूत अलंकाराचे खरे मानकरी व्हावे.



प्रिय सम्मानीय डॉक्टर, नागरिकांना निरोगी ठेवणे, रक्त, ज्योती आणि गरजेनुसार अवयवांचे स्थापन करीत सक्षम चिकित्सा सेवा देणे, रुग्णाची जीवनवृद्धी करणे आणि हा अर्थप्राप्तीचा हा एक उम्दा अधिकृत व्यवसाय आहे असे गृहीत धरून आपल्या कुटुंबियांच्या उदरभरणासाठी या व्यवसायातून असीमित अर्थप्राप्ती करणे ही तुमची समज आणि ध्येयनिष्ठता आहे कां ? कदाचित असे नसेल, पण जर अशी समज असेल तर प्रत्येक प्रिय सम्मानीय डॉक्टरांनी ती समज निश्चितच मनातून पूर्णपणे काढून टाकावी. कृपाकरून सर्व डॉक्टरांनी अशा नकारात्मक विचाराने कधीच ग्रसित होऊ नयेविसरू नये कि डॉक्टरचे हातून देवदूता प्रमाणे सद्कर्त्तव्य घडत असतं. हा ईश्वर प्रसाद असून त्यांचे हे सौभाग्यच म्हणायला पाहिजे.


प्रत्येक डॉक्टर अर्थार्जन करीत जीवनात  कधी  न  कधी   नि:स्वार्थ  आणि 
नि: शुल्क  ममत्वपूर्ण चिकित्सा सेवा करतो आणि रुग्णास नवजीवन देतो .   

 म्हणूनच डॉक्टर देवदूत म्हणविला जातो.  

परिस्थिती बघता आज अतिशय गरज आहे कि प्रत्येक डॉक्टरने स्वत:च कांही  रुग्णांसाठी कांही विशिष्ट प्रमाणात (कांही टक्के) बंधन राखून दररोज  मुळीच न विसरता नि:स्वार्थ व नि:शुल्क अशी परमार्थ चिकित्सा सेवा करावी
दररोज  पुण्य मिळवावे.डॉक्टरांनी सच्चे मानव व देवदूत अलंकाराचे  खरे  मानकरी व्हावे, 



अपेक्षा आणि विनंती आहे की    सर्व चिकीत्सकांनी  राज्य शासना कडून  ता. ३० ऑगस्ट ते ०१ सेप्टेम्बर २०१६ दरम्यान आयोजित 
" महा अवयवदान अभियान " 
या निमित्त स्वेच्छेने आत्मिक संकल्प घ्यावा की मी आजीवन देहदान-अवयवदान कां - कशासाठी आहे हे दररोज बोलता बोलता रुग्णांना आणि  त्यांच्या सहकार्यांना सांगत राहीन. जे कोणी माझ्या (डॉक्टरच्या) सल्याप्रमाने देहदान-अवयवदान करण्याचे इच्छापत्र स्वाक्षरी करून नोंदणीकृत होतील त्यांचा आत्मिक सम्मान करेन आणि निर्धन कुटुंम्बांच्या सदस्यांची (कांही निश्चित संख्येत) दररोज नि:शुल्क आणि नि:स्वार्थ चिकित्सा सेवा करेन. 
अशा प्रकारे देशाला सकारात्मक नवदिशा नवउर्जा देईन.
आणि
"महाराष्ट्राचा सच्चा मानव व देवदूत अलंकाराचा खरा मानकरी होईन."

विनंती आहे की नागरिकांनी डॉक्टरच्या सल्याचा मान राखावा 
आणि
मानव जीवन संरक्षणार्थ नि:स्वार्थ देहदान-अवयवदान करावे.
  

महाराष्ट्र शासनास  महा अवयवदान अभियान आयोजनांसाठी
 हार्दिक धन्यवाद.
आयोजनाच्या सफलतेसाठी आत्मिक शुभकामना. 
निवेदक :-- 
चंद्रकांत वाजपेयी. (जेष्ठ नागरिक  [ नोंदणीकृत अंगदान आणि भावी अवयवदान प्रस्तावक.]
एल 1 / 5, कासलीवाल विश्व, औरंगाबाद, महाराष्ट्र.ई-मेल : chandrakantvjp@gmail.com 

No comments:

Post a Comment