Wednesday, 14 December 2016

वाचा आणि समजून घ्या, डिजीटल / कैशलेस पैसे किती प्रकारे पाठविले जाऊ शकतात.

वाचा आणि  समजून घ्या,  
डिजीटल / कैशलेस पैसे किती प्रकारे पाठविले जाऊ शकतात.




कैशलेस अर्थात डिजीटल रूपात पैशाची देवघेव करण्याचे पांच प्रकार खाली नमूद केले आहेत :--

(१) बँकेचे एटीम कार्ड / डेबिट-क्रेडीट कार्ड वापरून आणि पिओएस वर कार्ड स्वाईप करून भुगतान.

(२) बैन्केचे आरटीजीएस / इनईएफटी द्वारे भुगतान. 
(३) नेट / मोबाईल बैंकिंग द्वारे भुगतान. 
( इंटरनेट संबद्ध कॉम्प्युटर/लेपटौप किंवा एंडरॉईड स्मार्ट फोन जरुरी. )  
अर्थात वेगवेगळ्या बैन्केचे एप्प्स वापरून आणि पेटीएम / फ्रीचार्ज सारख्या प्रायवेट कंपनी चे माध्यमाने भुगतान.
(४) बैंकचेक / बैंकड्राफ्ट द्वारे कैशलेस भुगतान.

(५) बिना इंटरनेट साधारण फिचरच्या स्वस्त मोबाईल द्वारे सरकारी यूएसएसडी माध्यमाने *99#  डायल करून 5000 रु. पर्यंत डिजीटल भुगतान.


बिनाइंटरनेट साधारण फिचरच्या स्वस्त मोबाईल द्वारे *99# डायल करून 5000 रु.पर्यंत फुकटात डिजीटल भुगतान कसे करावे ? असे भुगतान करण्याची सविस्तर माहिती खाली नमूद आहे. कृपाकरून ही व्यवस्था समजून घ्यावी आणि अंमलात आणावी :--


(१) डिजीटल भुगतानसाठी सर्वप्रथम संबंधित सर्व  मोबाईल फोन बैन्केत रजिस्टर्ड करणे आणि त्यांचे भुगतान करण्याचे कोड म्हणजे एमपिन बैन्केतून मिळविणे आवश्यक आहे.
हे काम बैन्केत जाऊन नि:शुल्क करावे. एमपिन गोपनीय असतो कोणालाही सांगू नये
.
गोपनीयता राखण्यासाठी हा एमपिन तुम्हाला स्वत: तुमच्या मर्जी प्रमाणे बदलता येऊ शकतो.

(२) *99# डायल करा, आता मोबाइल रजिस्टर केलेल्या बैंकेचे संक्षित नाव जे कांही असेल ते लिहा आणि डायल करा.[ उदाहरणार्थ युनियन बैंक ऑफ इंडिया लिहिण्या ऐवजी संक्षिप्त नाव  ubin  लिहायाचे. ]

(३) डिजीटल पैसे देव-घेव करण्यासाठी बैन्केत रजिस्टर्ड व एमपिन मिळविलेल्या मोबाईल करीता एकदा एमएमआयडी क्रमांक स्वत:च मोबाईल वरुन काढणे जरुरी आहे. तेव्हा *99# डायल करून बैन्केचे संक्षिप्त नाव लिहिणे झाल्यावर पुन: डायल करा. शोव एमएमआयडी चा क्रमांक 6 डायल करा. तुम्हाला एमएमआयडी क्रमांक मिळेल. हा क्रमांक स्वत:जवळ लिहून ठेवा. एमएमआयडी क्रमांक आणि मोबाईल क्रमांक व्यापाऱ्यांनी दुकानांत ठळक पणे सर्वाना वाचता येईल अशा स्थानी झळकावेत हे उत्तम राहील.

डिजीटल पैसे ट्रान्सफर / फंड ट्रान्सफर करण्याची विधी :--
(४) [अ] डिजीटल भुगतान करण्यासाठी *99# डायल करून डायल करा व बैन्केचे संक्षिप्त नाव लिहिल्यावर पुन: डायल करा.
.   [ब] क्रमांक 3 डायल करून एमएमआयडीच्या उपयोगातून फंड ट्रान्सफरचा विकल्प उपयोगात आणा.
.   [स] ज्याला डिजीटल रूपात पैसे पाठवायचे आहेत त्या लाभाधाराकाचा मोबाईल क्रमांक व त्याचा एमएमआयडी डायल करा.(डायल करण्याचे अगोदर लिहिलेला मोबाईल क्रमांक व त्याचा एमएमआयडी जरूर तपासून घ्या )
.     [द] जितके पैसे पाठवायचे आहेत तेवढे अंक लिहा व डायल करा.( गरज वाटल्यास पैसे कशासाठी याचे टिपण करता येईलं आवश्यक नाही.)

.     [ई] आता तुमचा गोपनीय एमपिन लिहा आणि जागा सोडून (स्पेस देऊन) बैंक खात्याचे शेवटचे चार अंक लिहा. 
तपासून बघा आणि डायल करा.
डिजीटल स्वरूपात पैसे भुगतान झाल्याचा सविस्तर संदेश मिळेल.

(५) सरकारी यूएसएसडी तंत्राचे माध्यमातून रजिस्टर मोबाईल द्वारे बिना इंटरनेट वापरता खालील सेवेचे खाली नमूद लाभ घेता येईल :--(अ) बैंक खात्यातील बचत पैशाची माहिती मिळेल. ( बैलेंस इन्क्वायरी ) बटन क्रमांक 1 डायल करून मिळेल.
(ब) बँक व्यवहाराचे स्वल्प विवरण ( मिनी स्टेटमेंट ) बटन क्रमांक
2  डायल करून मिळेल.
(
)  तुमचा एमएमआयडी काढता येईल. बटन क्रमांक 6  डायल करून मिळेल.
(द) एमएमआयडीचा
विकल्प निवडून फंड ट्रान्सफर करता येईल. बटन क्रमांक 3  डायल करून मिळेल.
टीप : बैंक आयएफएससी क्रमांक आणि  बैन्कखाते क्रमांकाचा वापर करून देखील फंड फंडट्रान्सफर केले जाऊ शकते.() गोपनीय एमपिनचा बदल करता येईल.  बटन क्रमांक 7  डायल करून मिळेल.
(
फ) सरकारी विभागांचे भुगतान / कंपन्यांचे भुगतान करण्यासाठी एकाच वेळी उपयोगी पासवर्ड OTP बनविता येईल.  [ IMPS merchant payment ] 
लोक शिक्षणार्थ नि:स्वार्थ व नि:शुल्क प्रसारित.
...... चंद्रकांत वाजपेयी. (जेष्ठ नागरिक)
गैरराजकीय सामाजिक कार्यकर्ते, औरंगाबाद. [ महाराष्ट्र  ]
ई-मेल : chandrakantvjp@gmail.com

No comments:

Post a Comment