Tuesday, 3 January 2017

*99# डायल करून डिजीटल भुगतान सर्वांना सोईस्कर, म्हणून लोकशिक्षणाचा उपक्रम.

*99# डायल करून डिजीटल भुगतान सर्वांनाच सोईस्कर,


म्हणून लोकशिक्षणाचा उपक्रम


रोख-पैशाचे भुगतान अपारदर्शी असते. अनेकदा अपराध-अनैतीककृत्ये, आतंक, खोट्यानोटां छापणारे-वापरणारे, भ्रष्टाचार-घोटाळे करणारे वगेरे मंडळींना रोखपैशामुळे संरक्षण मिळते . रोख पैशाचा मोठा भाग दडपला जातो, अडकून पडतो आणि चलनात रहात नाही. त्यामुळे गरजूंना, तसेच विकास कामाला बैन्केतून वेळेवर आवश्यक पैसा न मिळाल्याने हानि होणे, अधिक व्याज देण्यास भाग पडणे आणि देशाच्या जीडीपीवर नकारात्मक परिणाम होणे साहजिक आहे. डिजीटल {केशलेस} भुगतान पद्धती पारदर्शक आहे. ही व्यवस्थां निश्चितच देशभरात सर्व नकारात्मक घटनांना आणि वाढत्या दुष्प्रवृत्त इसमांच्या कृतीला पूर्णपणे रोखून राष्ट्रविकास, नागरिकविकास आणि सुरक्षेला पाठबळ देऊ शकेल, त्यामुळे शासनाचा निर्णय सम्मानजनक आहे. शासनाने अर्थक्रांतीचे प्रस्ताव जसेचे तसे लागू केले आणि लोकपाल नियुक्ती झाली तर निश्चितच “ दुग्ध-शर्करा ” योग साधता येईलं.
फक्त देशहितार्थ गैरराजकीय नागरिक या नात्याने आम्ही उल्कानगरी-गारखेड्यातील कांही जेष्ठनागरिक, युवक, माता-भगिनी, जनप्रतिनिधी, तसेच संभाजीनगर (औरंगाबाद) येथील अर्थक्रांती व भ्रष्टाचार-विरोधाचे कांही समर्थक तसेच “ ईको विंग्ज युथ फौन्डेशन ” चे तरुण नि:शुल्क व नि:स्वार्थ पणे डिजीटल {केशलेस} भुगतान करण्याचे लोकशिक्षण देण्याचा व जनजागृती करण्याचा उपक्रम राबवित आहोंत. शहर आणि कांही खेडे-गांवांत हे शिक्षण देण्याचे आमचे मानस आहे. यामुळे नागरिकांना सुट्टे पैसे मिळत नसल्याने होणारा त्रास कमी करणे. देशहितार्थ पारदर्शक अर्थव्यवस्थेचे धोरण राबविणे आणि केशलेस भुगतान अभिवृद्धीसाठी सरकारी ऑफिसांना समस्याची पुरवणी व समाधानासाठी त्यांना यथाशक्ती मदत करणे हा आमच्या नि:स्वार्थ उपक्रमाचा उद्देश्य आहे.
हे उघड आहे कि प्रत्येक व्यक्ती आणि दुकानदार किंवा प्रत्येक व्यवसायी, मजूर-सेवक वगेरे फक्त चेक/बँकड्राफ्ट, वेगवेगळे एप्स इंटरनेट/एंडरॉइड-स्मार्टफोन वापरून व डाउनलोड करून नेटबैंकिंग किंवा पीओएस वापरून डिजीटल डेबिट-क्रेडीट कार्ड द्वारे भुगतान करण्याचे काम करू शकत नाहीत. प्रत्येक दुकानदाराला / ठेलेवाले छोटे व्यापारी यांना जरुरी करंट खाते वापरणे देखील शक्य नाही. तेव्हा या समस्येचे समाधान किंवा सर्वोत्तम उपाय म्हणजे युएसएसडी मंचवर *99# डायल करून डिजीटल केशलेस भुगतान करणे सर्वांना परवडणारे आणि सोपे आहे. *99# डायल करून डिजीटल केशलेस भुगतानांसाठी इंटरनेट किंवा महागड्या स्मार्टफोनची गरज नाही, हे विशेष.

No comments:

Post a Comment