''क्यो करो ? या क्यो मरो ?''
प्रेमळ बंधू - भगिनीनो,
आपल्याला मनातून असे वाटते न कि सरकारी क्षेत्रातील सर्व कामे एक पैसा देखील लाच न देता, वेळेवर होण्याची सक्षम व्यवस्था आपल्या देशात असावी आणि आपला देश पूर्ण पणे भ्रष्टाचारमुक्त असावा.
निश्चितच हे शक्य आहे. या साठी फक्त न घाबरता अण्णा हजारे यांच्या आंदोलनात आपली स्वत:ची आणि आपल्या घरातील सदस्यांची व्यक्तिगत उपस्थिती - पाठींबा आणि आत्मिक सहयोग पाहिजे. आपल्या याच कामा साठी अर्थात आपली ईच्छा पूर्ण व्हावी म्हणून देशासाठी तळमळणारे व प्राणपणाने झिजणारे विख्यात समाजसेवी ७४ वर्षाचे आदरणीय अण्णा हजारे आणि त्यांच्या टीमने कठोर सक्षम " जन लोकपाल कायदा तयार केला आहे , पण सरकार हा कायदा लागू करण्यास तयार नाही." अर्थातच
सरकार आपल्या मनातल्या म्हणजे जनतेच्या ईच्छा पूर्ण करायला तयार नाही हे उघड दिसून येते. खरे तर आपल्या देशाच्या घटनेत (संविधानात) स्पष्ट लिहिले आहे कि सरकारने देशाचे राज्य लोकतंत्र पद्धतीने चालवायचे आहे. " लोकतंत्र म्हणजे जनतेच्या ईच्छानी चालणारे तंत्र किंवा लोकांच्या ईच्छेने चालणारे शासन. म्हणूनच जेष्ठ समाजसेवी अण्णा हजारे साहेब जनलोकपाल कायदा लागू करवून आपली [जनतेची] ईच्छा पूर्ण व्हावी म्हणजेच देशात खरोखर लोकतंत्र [ गणतंत्र ] स्थापित व्हावे असे प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. या साठी अण्णाचे सहकारी गेल्या २५ जुलाई २०१२ पासून आपला मृत्यू हातावर घेवून आमरण उपोषण करीत आहे. इतकेच नव्हे स्वत: अण्णा २९ जुलाई १२ पासून बेमुदत उपोषण करीत आहेत.
प्रिय बंधू-भगिनीनो, खालील बिंदूवर निष्पक्ष विचार करा, स्वत: आपल्या मनातून ठरवा - निर्णय घ्या | आजच निश्चय करा कि आज आपल्या सर्वाना काय करायला हवे
आता वेळ नाही, आता फक्त आणि फक्त एकच " करो या मरो "
विचार करा :--
(१) काय आपल्या असंख्य पूर्वजांनी जीवनाची आहुती देवून दिलेलं "स्वराज्य" आणि भारतीय संविधानातून प्राप्त '' गणतन्त्र [ लोकतंत्र ] " खऱ्या अर्थाने अर्थाने आज व्यवहारातून आढळतो आहे का ?
(२) काय खरे 'स्वराज्य' आणि यथार्थ लोकतंत्र [ गणतंत्र ] याचे रक्षण करायचे का ?
(३) काय खरे 'स्वराज्य' आणि यथार्थ लोकतंत्र / गणतंत्र याचे रक्षण करणे आपला राष्ट्रीय धर्म आणि कर्तव्य आहे ? किंवा नाही ?
(४) काय निर्भिक होवून अण्णा आणि त्यांच्या सहकार्या सोबत स्वत: लढा लढायचा ?
(५) " काय शासनाचा कैवार घ्यायचा ?" किंवा " स्वत: घाबरट पणा सोडून तुमच्या-आमच्या परिवाराच्या रक्षणासाठी स्वत:चे बलिदान देण्यास आहूत असणार्याना प्रत्येक पातळीवर सहकार्य देवून शासनास तात्काळ जनलोकपाल कायदा लागू करण्यास भाग पाडायचे ?
" त्या साठी काय व्यवस्था परिवर्तनाचा हठ्ठहास धरायचा ?
" त्या साठी काय व्यवस्था परिवर्तनाचा हठ्ठहास धरायचा ?
(६) काय स्वातंत्र्याच्या ६५ वर्षानंतर सुद्धा जनतेचे काम लाच खोरी शिवाय तसेच वेळेवर होऊ नये असे आपले मन आणि मत आहे का ? काय या पद्धतीला समर्थन आणि संरक्षण देणार का ?
आग्रह करतो कि कृपाकरून आपण आपल्या शुद्ध व्यवहारातून हे प्रमाणित करा कि :--
" तुम्ही खरोखर भारत-मातेचे निष्ठावान पुत्र / पुत्री आणि स्वतंत्र भारताचे खरे नागरिक आहात. "
निवेदक :- चंद्रकांत वाजपेयी, +919730500506. chandrakantvjp@gmail.com
जय हिंद - भारत माता की जय - वंदे मातरम - इन्कलाब जिंदाबाद.
No comments:
Post a Comment