Saturday, 19 January 2013

" युवा राहुल गांधी, यांची सत्ताधीश कौन्ग्रेस मध्ये उपाध्यक्ष पदी निवड तेव्हाच हितकारी ठरेल जेव्हा ........ ? "



 युवा राहुल गांधी, यांची सत्ताधीश कौन्ग्रेस मध्ये 

उपाध्यक्ष पदी निवड तेव्हाच हितकारी ठरेल जेव्हा...?


MONDAY, 14 JANUARY 2013
युवा पुढाकार प्रशंसनीय, पण...............घर ना डूबे ही काळजी आवश्यक.

लोकसभा निवडणूक राहुल यांच्या नेतृत्वा खालीच online2.esakal.com

" युवा पुढाकार प्रशंसनीय, पण घर ना डूबे "

सुखाची बाब आहे की कौंग्रेस पक्षानें तरुण नेतृत्वास पुढाकार देण्याचे ठरविले आहे. निश्चितच हे स्वागत योग्य आहे, पण युवा नेता श्री राहुल गांधी यांना अजून " राष्ट्रभक्ति, माणुसकी आणि राष्ट्रधर्म " शिकण्याची गरज आहे.

" लक्षात असू द्यावे कि राष्ट्रीय नेतृत्व करणार्या इसमास या उल्लेखित कृतीतून स्थापित व्हावेच लागते. सामान्य जनतेस हे अपेक्षित असते.जर ही अपेक्षा पूर्ण होत नसेल तर सामान्य जनता अशा नेतृत्वास अपरिपक्व नेतृत्व आहे असा विचार करते आणि अशा अपरिपक्व नेतृत्वास स्वीकार करायला तयार होत नाही. श्री राहुल गांधीच्या नेतृत्वातझालेल्या उत्तर प्रदेशातील निवडणुकाचे परिणाम वरीलसिद्धान्ताचे जिवंत प्रमाण आहे.

श्री राहुल गांधी यांना अजून " राष्ट्रभक्ति, माणुसकी आणि राष्ट्रधर्म " शिकण्याची गरज आहे असे लिहिण्याचे कारण असे की आता पर्यंत त्यांचा राष्ट्रीय व अंतर्राष्ट्रीय - सर्वत्र रोष निर्माण करणार्या, विभिन्न दु:खद व कटु घटनांच्या संदर्भात उदासीन व्यवहार  आढळला आहे. नमूद पद्धतिच्या प्रसंगान्वर राष्ट्रिय नेतृत्व करण्या- साठी त्यांनी कधीच पुढाकार घेतला नाही व प्रतिक्रया दिली नाही. राष्ट्रीय नेत्याकडून जनतेस हे वर्तन अपेक्षित नसते. निश्चितच त्यांचे हे वर्तन हे कौंग्रेस पक्षास महाग पडू शकेल. 

वर्त्तमान घटनांतील उदाहरणे बघा :-- अमानवीय विभत्स स्त्री बलात्कार घटना, ओवेसी चे देश तोड़क वक्तव्य, पाकिस्तान तर्फे सीजफायर उल्लंघन, पाक कडून दोन भारतीय बहादुर सैनिकांची 
निर्मम हत्या व एका सैनिकाचे शिर छेदन व शिर अपहरण, या बहादुर सैनिकांच्या शोकाकुल परिवारास धाडस बांधणे व अंत-विधि प्रसंगी उपस्थिति न दर्शविणे या मानवीय कर्तव्य पासून 
राहुलजींची अलिप्तता इत्यादि.

खर्या राष्ट्रीय स्तराच्या नेत्यास अशा सर्व प्रसंगात अलिप्त राहणें तसेच असहायक किंवा प्रतिक्रया विहीन राहणें शोभायमान नाही, तेव्हा कॉंग्रेस पक्षानें श्री राहुल गांधी यानां वरील विषयाचे व्यावहारिक शिक्षण दिले तर खरोखर पक्षाचे आणि देशाचे भले होइल. 

काय कॉंग्रेस पक्ष या कडवट औषधाचे प्राशन करून स्वत: ची आणि देशाची प्रकृति धड़धाकट ठेवण्याचा प्रयत्न करेल का ?

विशेष टिप :--  दिनांक 19 JANUARY 2013.
[ लेखकास श्री राहुल गांधी पेक्षा देश आणि राजकीय पक्ष मोठा वाटतो, म्हणून नि:ष्पक्ष पणे राष्ट्ररक्षणार्थ यथार्थ अनुभव ५ दिवसा पूर्वी १४ जानेवारी २०१३ ला रेखांकित केले आहेत. 
आज १९ / ०१ / २०१३ रोजी युवा राहुल गांधी यांना काँग्रेसचं राष्ट्रीय उपाध्यक्ष पद देण्यात आलं आहे. "शुभेच्छा." श्री राहुल गांधी यांनी आता फ़क्त भारतीय मानव बनावे, आणि त्या अनुशंगानेंच कौंग्रेस पक्षाची कार्य योजना व्यवहारात आणावी, हेच  या प्रसंगी हार्दिक शुभाशीष. ]  

No comments:

Post a Comment