एकच चॉकलेट, कोणाला मिळणार ?
जन हो, तुम्ही कोणास देणार ?
एकच चॉकलेट आहे. अनेकानेक घरातील लोक या एका चॉकलेट साठी हट्ट धरताहेत - जिवानिशी धडपड करताहेत.
एका घरातून मिस्किल पणे असे सांगण्यात येते कि " आमच्या घरातील डझन-दीड डझन लोक आपले - आपले तोंड उघडे ठेवून बसले आहेत. सर्वानांच हे चॉकलेट आवडते आणि पचवता सुद्धा येते, बर का !" अहो राजे असे कसे काय म्हणता कि प्रत्येकालाच हे चॉकलेट मानवते ? फ़क्त चॉकलेटचे पैकिंग पहा आणि गप्प बसा, एवढेच पुरे."
भाऊबन्दकी असणारच, मग या घरातून चॉकलेट कोणाला मिळणार ?
कसे सांगता येइल ?
आता दुसर्या एका घराण्याची माया पहा, पूर्णपणे वेगळी स्थिति. तेथे एकाला सोडून असंख्य लोक या चॉकलेट साठी हापापले आहेत. हे लुबाडण्या साठी घात लावून बसले आहेत. पण तेथे तुला न मला घाल त्या कुत्र्याला अशी परिस्थिति झाली आहे. जो चॉकलेट मागत नाही त्याच्या हातात गन आहे न ? मग धाक असणारच. गोळी खावुन मुत्युमुखी कोण जाणार ? या घराण्यात मनस्वी इच्छा नसली तरी गनधारीच्या नात्यातील एखाद्या अतिलगट असणार्या व्यक्तीचे तोंड खोलून त्याच्याच तोंडात हे चॉकलेट टाकुन आपण आपसात भांडण करायचे नाही ही वंशानुवंशी दिली जाणारी शिकवण
आजतायत तेथे जोपासली जाते आहे. खरोखर हे नवल नव्हे का ?
पण जसे दिसते तसे नसते. '' एखादी हाव कोणाचा केव्हा कोठे छळ मांडेल हे कांही सांगता येत नाही. या चॉकलेटची हाव त्या घरात शान्ति आणि एकोपा कधी दूर सारेल हे देखिल सांगता येत नाही." गोड चॉकलेट साठी या श्रेष्ठ घराण्यातील लोक स्वत: ला अलिप्त राखून नकळत गन हिसकावून घेण्याचा किंवा गनधारीच्या अतिलगट असणार्या नातेवाइकाला अपचनीय चॉकलेट चा
खोटा खाऊ देवून रोगी करण्याचा डाव रचू शकतील तर नवल कां मानावे ?
मग आता या परिस्थितीत चॉकलेट कोणाला मिळणार
कसे सांगता येइल ?
अशी शेकडो घरे आहेत, ज्यांच्या कुटुम्बियांना हे चॉकलेट हवे,
मग आता हे कोणास द्यावे हेच कळत नाही. कारण सर्वच आपले आहेत.न ?
आजकाल देशभरातील राजकीय पक्षांच्या व्यवहारातून देखिल
असेच आढळू लागले आहे कि
पन्तप्रधान नावाचे एखादे चॉकलेट भारतात आहे .
जन हो, गुपचुप सांगा कि
" हे पंतप्रधान नावाचे चॉकलेट तुम्ही कोणाला देणार ? "
No comments:
Post a Comment