समाजात घडणारे सर्व अमंगल, अनिष्ट व दुष्कृत्य रोखण्याचा
एक रामबाण उपाय.
एक रामबाण उपाय.
संयमाने आणि शांतपणे बोलणे, लोभ आवरणे हे सोपे काम नाही.
माणूस स्वत:च्या मनावर ताबा ठेवू शकत नसल्यामुळेच उत्तेजित,
क्रोधी, दु:खी किंवा आनंदित होऊन बेफाम होऊ शकतो. अशा प्रसंगी त्या
माणसाची प्रतिक्रिया त्याच्या स्वरात म्हणजे आवाजात, भाषा प्रयोगात
आणि बदल झालेल्या आचरणातून दिसू लागते.
त्या वेळी माणसाचे हातून कळत किंवा नकळत अमंगल, अनिष्ट वा
दुष्कृत्य सुद्धा घडतात. त्यामुळे माणसाने मनावर ताबा ठेवणे अत्यंत
गरजेचे असून त्यासाठी दररोज सराव करण्याची गरज असते.
म्हणूनच शाळा व कौलेजातील शिक्षणात मनावर ताबा ठेवण्याचा
कर्तव्यशील अभ्यासक्रम दररोज सरावासाठी राबविण्यात यावा हे
अतिशय गरजेचे वाटते.
अर्थात समाजातील सर्व वाईट दूर सारण्याचा हा एकमेव स्थिर व जरुरी
रामबाण उपाय आहे, हे कोणीही विसरू नये.
......... चंद्रकांत वाजपेयी.
जेष्ठ नागरिक, औरंगाबाद. [ महाराष्ट्र ]
ई-मेल : chandrakantvjp@gmail.com
No comments:
Post a Comment