Monday, 17 September 2012

' प्रत्येक दानराशिचा १००% भ्रष्टाचारमुक्त उपयोग करविणारी " जनधन क्षेत्रसमृद्धि योजना " कधी राबविली जाणार ?


महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब 
प्रत्येक दानराशिचा क्षेत्र विकासासाठी 
१००% भ्रष्टाचारमुक्त उपयोग करविणारी 
'' जनधन क्षेत्रसमृद्धी योजना  ''   

कधी राबविली जाणार ? 
१३ / ०९ / २०१२.
प्रेषक :-- चंद्रकांत वाजपेयी [ जेष्ठ नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ता ]
एल १ / ५, कासलीवाल विश्व, उल्कानगरी, पर्वतीनगर, गारखेडा, औरंगाबाद.( महाराष्ट्र ) पिन :-- ४३१००५.
ई -मेल :-- chandrakantvjp@gmail.com मोबा. :- +९१९७३०५००५०६

प्रति,
माननीय सतीश लळीत साहेब, { मुख्यमंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी }
मुख्यमंत्री सचिवालय, खोली क्र. 629, सहावा मजला, मंत्रालय, 
हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मुंबई-400 032.
दूरध्वनी : 022 - 2202 4901. फॅक्स : 022 - 2281 7068. मोबा. क्र. +९१९४२२४१३८००.
ई-मेल : satishlalit@gmail.com, mahacmpro@gmail.com 

विषय :-- जनधन क्षेत्र समृद्धी योजना.

संदर्भ :- (१) दि. ०३ / ०९ / २०१२. चा माझा आपणास प्रेषित ई-मेल.
       (२) दि.१३/०९/२०१२ दुपारी ०३:०९ वाजता वरील मोबा. क्र.  वर झालेली चर्चा.
       (३) २५ जून २०११ ला मुख्यमंत्री साहेबांच्या सरकारी ई-मेलआयडी वर पाठविलेला ई-मेल. 

मान्यवर, 
सप्रेम नमस्कार.
आपल्या सेलफोन वर झालेल्या चर्चेनुसार संक्षिप्त माहिती नमूद करीत आहे. विनंती आहे की या माहितीनुसार मुख्यमंत्री साहेबां कडून " जनधन - क्षेत्रसमृद्धि योजना "{महाराष्ट्रात - एक पायलेट प्रोजेक्ट} राबविला जावा याची परवानगी घेण्याचे करावे.

ही योजना स्थानीय विकास कार्यां साठी जनते वर कोणताही  
वेगळा टैक्स न आकारता अतिरिक्त निधी सहज मिळवून देते  
 निधीचा वापर अनाठायी खर्च रोखत असून ,१०० % भ्रष्ठाचारमुक्त कार्य संपादित करविते ।
स्व. श्री राजीव गांधीच्या अपूर्ण इच्छेची पूर्णता होणे 
 जनधन क्षेत्रसमृद्धी योजनेची एक आगळी - वेगळी विशेषता आहे.
" श्री राजीव गांधी यांची मनस्वी ईच्छा होती कि -
रु.१००/- खर्च होतात पण जनलाभ फक्त १५ % होतो, 
हे दुर्दैवी चित्र बदलून १०० % जनलाभ करणे.

--:जनधन क्षेत्रसमृद्धी योजनेचे कार्य सिद्धांत :-- 

फक्त शासनतर्फे मान्य बारकोडेड कुपन्सच्या माध्यमातून पारदर्शक पद्धतीने प्रत्येक प्रकारचे एकत्रित दान / चंदे किंवा वर्गणी अधिकृत व कायदेशीर राहील, हे योजनेतून अनिवार्य राहील. राज्यात इतरत्र पद्धतीने दान/ चंदे / वर्गणी अपराधिक मान्य होईल. एकूण एकत्रित राशीचा केवळ ७० % भाग राशी एकत्रित करणार्या अधिकृत व्यक्तिंना खर्च करता येईल आणि अभिशेष ३० % राशीचा उपयोग, क्षेत्राच्या विकासात व दान - दातांच्या व्यक्तिगत लाभा साठी विशिष्ठ पद्धतीने खर्च होऊ शकेल. दान / चंदे किंवा वर्गणी संकलित करणार्याना दुप्पटीने निधी एकत्रित करता येईल पण ३० % राशी जमा करणे बंधनकारी राहील. स्वेच्छेने त्याना स्थानिक ( ग्राम / मोहल्ला ) विकास निर्मिती योजना किंवा स्थानिक समस्या निदानार्थ व्यवस्था करण्या संबंधी निर्देश देण्याचे चे विशेष अधिकार निहित राहतील, ज्या मुळे निधी देणारे आणि प्राप्त करणारे दोघेही समाधानी आणि आनंदी राहतील.
मान्यवर , 
देश व राज्य हितार्थ नि:स्वार्थ भावनेने पुन: विनंती आहे कि वरील माहिती प्रमाणे आपण आदरणीय मुख्यमंत्री साहेबाना " जनधन - क्षेत्रसमृद्धि योजना " कृतीत आणण्या साठी आग्रह करावा आणि प्राथमिक स्वीकृती घेवून मला पत्र प्रेषित करून निर्देशित करावे, म्हणजे गरज लागल्यास स्वत: विस्तृत कार्ययोजना शासनापुढे मांडण्याचा प्रयत्न करेन. आपल्या या कार्यासाठी मी आपला सदैव आभारी राहीन.   धन्यवाद. शुभकामनासह,

राष्ट्रहितार्थ प्रतिबद्ध,

चंद्रकांत वाजपेयी ( जेष्ठ नागरिक एवं सामाजिक कार्यकर्ता ) 
ई-मेल:-- chandrakantvjp@gmail.com
मोबा.क्र. +९१९७३०५००५०६.







No comments:

Post a Comment