२८ - १० - २०१२.
प्रिय भारतीय युवांनो / युवतीनो आणि प्रसार माध्यमांचे सर्व संपादक
सुखद आयुष्य भव.
दुर्गा म्हणजेच शक्ती.
युवतीनो, आपण सर्व दुर्गांच आहात -
शक्तिपुंज आहांत. महिलाच दुर्गा असतात. त्याच लक्ष्मी आणि सरस्वती
असतात. खरे
तर मुलगी तीच देवी आणि वंशाची ज्योत आहे, पण आज
भारतात "मुलगा हवा - मुलगी नको" तसेच " पाश्चिमात्य संस्कृतीच्या
प्रेम प्रकरणातील सहवास व्यवस्था " या निकृष्ट व्यवहारांच्या अधिक
व्याप्ती मुळे मानव लिंग - संतुलन बोकाळले जात आहे असे दिसून येते.
या सामाजिक अति महत्वपूर्ण विषया वर चिंतीत होण्याची आणि हे
रोखण्यासाठी उपाय योजना शोधण्याची आज गरज आहे.
भृणहत्या रोखण्या संदर्भात खाली नमूद केलेल्या बिंदूंवर शासनाने
व्यवस्था कराव्यात.तसेच या व्यवस्थेच्या स्थापनेसाठी युवांनी विशेष
करून युवतींनी आणि प्रसार माध्यमांनी आपल्या लेखनातून आणि
आंदोलन करून शासनास या तांत्रिक व्यवस्था कायम
करण्यास भाग पाडावे हीच एक
अपेक्षा.
वर उल्लेखित उद्देश्य प्राप्ती साठी तांत्रिक व्यवस्थांचे मुख्य बिंदु खालील प्रमाणे आहेत :--
(१) देशातील प्रत्येक सोनोग्राफी मशीन (अर्थात लिंग तपासणी / लिंग
प्रमाणीकरण मशीन) ची जोडणी आणि या उपकरणाच्या प्रत्येक
संचलनाचे वृत्त अधिकृत वेबसाईटवर करणे बंधनकारी केले जावे.
(२) देशात गर्भधारण करणार्या प्रत्येक स्त्री ला सरकारी किंवा गैरसरकारी
दवाखान्यात अधिकृत नोंदणी करणे { पंजीयन करणे } आणि त्या स्त्री
ला
या संदर्भात एक विशिष्ट क्रमांक दवाखान्यातून प्राप्त करणे बंधनकारक
केले जावे. अपन्जीकृत आणि विशिष्ट क्रमांक प्राप्ती विना प्रसूतीस
अवैधानिक मान्य करून शिक्षेच्या व्यवस्थेची तरतूद असावी.
सोनोग्राफीकरणे अनिवार्य करून सोनोग्राफी खर्च शासनाने वहन करावा.
(३) जिल्हा केन्द्र वरील प्रत्येक सरकारी आणि गैरसरकारी दवाखान्याची
वेबसाईट अनिवार्य करावी. वेबसाईटवर पंजीकृत गर्भधारीत स्त्री चे प्रकृती
विषयक विवरण आणि सोनोग्राफी रिपोर्ट प्रमाणे गर्भाचे लिंग { दिलेल्या
विशिष्ट क्रमांका च्या संदर्भात } दर महिन्यात तिची प्रसूती होई पर्यंत
रेखांकित करणे बंधनकारी करावे. याचे पालन न करणार्यां डॉक्टरांचे /
दवाखान्याचे रजिस्ट्रेशन - मान्यता / लायसंस रद्द करण्याची तरतूद
करावी.
(४) तालुका केंद्र वर तालुक्यातील सर्व दवाखान्यातील पंजीबद्ध महिलांची
दर महिन्याची स्थिती संकलित केली जावी आणि ही माहिती जिल्हाकेंद्रा
वरिल अधिकृत वेबसाईट वर रेखांकित केली जाण्याचे बंधन असावे.
(५) www.corruptionfree.in या वेबसाईट मध्ये उल्लेखित योजने
प्रमाणे स्त्री च्या नावाची गुप्तता आणि व्यक्ति स्वातंत्र्य सुरक्षित ठेवता
येईल, शासनाने या कडे जवाबदारीने लक्ष द्यावे..
(६) जे चिकित्सक किंवा दवाखाने किंवा विषय संबद्ध व्यक्ति भ्रूण हत्येचे
अपराध
करतील त्यांना तुरुंगवासाची शिक्षा करण्याचे प्रावधान असावे.
वरिल तांत्रिक पध्दतीच्या मांडणी मुळे आपल्या देशात शक्तीपुंज
अर्थात खर्या अर्थाने अनेक दुर्गांचे स्थापन होईल आणि दानव प्रवृत्तीस
आळा बसेल. सत्कर्मासाठी शुभाशिर्वाद,
" शासनासह सर्वास हार्दिक शुभेच्छा."
----- पत्र प्रेषक -----
आपले पितृतुल्य मंडळी {जेष्ठ नागरिक}
chandrakantvjp@gmail.com
कासलीवालविश्व उल्कानगरी, पार्वतीनगर, गारखेडा, औरंगाबाद.
४३१००५.
No comments:
Post a Comment